बातम्या शेअर करा

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत पोलिसांनी संशयित १२ जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. रेश्मा गुरव यांनी माखजन पोलिस दूरक्षेत्रावर याबाबतची खबर दिली आहे .

रेश्मा गुरव यांच्या जमिनीत रंजिता गुरव ही जमीन खणत होती. म्हणून माझे पती रवींद्र गुरव यांनी “ही आमची जमीन आहे तू खणू नको”. तेव्हा ती म्हणाली “तू बायकांसारखा बोलू नकोस. तू माझ्या नवऱ्याजवळ बोल”. तेवढ्यात तेथे रंजिता गुरव हिचा नवरा रघुनाथ गुरव हा तेथे आला. त्यानंतर मला व माझ्या पतीला शिवीगाळ करू लागला. त्यानंतर आम्ही घरी आल्यावर रघुनाथ गुरव, चंद्रकांत गुरव, अक्षय गुरव, महेंद्र पालांडे, मधुकर गुरव, संतोष पालांडे, दीपक गुरव, संतोष पालांडे, जितेंद्र चव्हाण, रंजिता गुरव, मिलन गुरव, राजेश्री गुरव सर्व रा. करजुवे गुरववाडी हे गैरकायदा जमाव करून आमच्या घराजवळ येऊन लाठ्याकाठ्या घेऊन दरवाजावर व खिडकीवर मारू लागले. त्यावेळी चंद्रकांत गुरव व महेश पालांडे यांच्या काठ्या माझ्या उजव्या हाताला लागून किरकोळ दुखापत झाली आहे. ठार मारण्याची धमकीही दिली. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकांस्टेबल प्रशांत शिंदे, उशांत देशमवाड, संदेश मोंडे अधिक तपास करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here