बातम्या शेअर करा

रत्नागिरी – कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास करताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून राज्य शासनाने गणपती सणासाठी चाकरमानी यांच्यासाठीं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे.तसेच तर राष्ट्रीय महामार्ग 66 वरून जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे संबंधीत कोकणाकडे ये जा करणाऱ्या वाहनांची संखया मोठ्या प्रमाणात वाढून वाहनांची कोंडी होऊन गैरसोय होते त्यामुळे मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 115 मधील तरतुदीचा वापर करून सार्वजनिक हितासत्व मुबंई -गोवा महामार्गवरील रत्नागिरी सिधुदुर्ग रायगड जिल्ह्यात येणाऱ्या अवजड वाहन ( 16 टन पेक्षा अधिक असलेले वाहन ) बंदी घालण्यात आली आहे.

त्यामध्ये ट्रक, मल्टीएक्सल व ट्रेलर यांच्यावर पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे. सदरची बंदी दि. 10 ऑगस्ट पासून दि. 29 ऑगस्ट पर्यत राहणार आहे. असा आदेश महाराष्ट्र शासन गृह परिवहन विभाग यांनी जारी केला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here