अहमदपूर- सत्कार होतातच पण, असा अनोखा सत्कार आज अहमदपुर मराठी समविचारी पत्रकार संघ, व सर्व अहमदपुर तालुक्यातील पत्रकारांनी घडवून आणला हा सत्कार होता. शहरातही जैद सादिक यांचा हा मुलगा आहे वृत्तपत्र विक्रेता सादिक दहावीला 80 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली ते अहमदपुर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी, सहसा सत्कार होतात ते शंभर टक्के किंवा 99 टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांचे, पण असा अनोखा सत्कार आज अहमदपुर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी घडवून आणला या कार्यक्रमाला, अहमदपूरच्या पोलीस विभागीय अधिकारी अश्विनी पाटील , ज्येष्ठ पत्रकार राम तत्तापुरे, मराठी समविचारी पत्रकार संघ अहमदपूरचे संस्थापक अध्यक्ष दैनिक लोकमतचे सलीम सय्यद, विद्यमान अध्यक्ष बाशीद पठाण, प्राध्यापक रत्नाकर नळेगावकर, दैनिक लोकमतचे रोकडा सावरगाव प्रतिनिधी बबन आत्तार, दैनिक पुण्यनगरीचे गजानन भुसारे, मेघराज गायकवाड, उदय गुंडीले, दैनिक गावकरीचे प्रा शेख, सचिन कोंडलवाडे, गोविंद काळे, मासूम शेख, आदि ज्येष्ठ पत्रकार बांधव उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक शेख यांनी केली, या कार्यक्रमामध्ये अश्विनी पाटील यांनी सदरील मुलाला शुभेच्छा दिल्या, व अशा अनोख्या सत्कारास बोलवल्या बद्दल सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले.