चिपळूण – कोरोनाचा वाढता प्रभाव जिल्ह्यात असताना आता चिपळूण शहरात मात्र कोरोना बाधित रुग्णांनी 540 आकडा पार केल्याने चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत 2064 एवढे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत त्यात चिपळुण तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 540 एवढा झाला आहे. यातील १५३ रुग्ण सध्या अॅक्टिव आहेत. त्यामध्ये शहरी भागात २६८ तर ग्रामीण भागात २७२
असे एकूण ५४० रुग्ण चिपळूण तालुक्यात आहेत. तर चिपळूण तालुक्यात आजवर 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तर आजवर ३७० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.