बातम्या शेअर करा

रत्नागिरी – कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच आता श्रावण सुरू झाल्याने या महिन्यात मोठ्या भक्तिभावाने कोकणातील मंदिरातून नाम सप्ताह पार पडतो. परमेश्वराच्या नामस्मरणात, भजनात, अभंगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच तल्लीन होतात. अत्यंत पावित्र्य जपत कोकणातील गावागावातून हा सप्ताह पाळला जातो. कुठे एक दिवस तर कुठे सात दिवस खंड न पडता टाळ मृदुंगाच्या गजरात परमेश्वराचे नामस्मरण केले जाते.
रत्नागिरी जवळील तोणदे येथील एक व्हिडीओ समोर आला असून यात मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घालूनही नाम साप्ताह चालू ठेवणारे काही भाविक दिसत आहेत. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी होडीचा देखील वापर केलेला दिसत आहे. भजनी मंडळींच्या छातीपर्यंत पुराचे पाणी येऊनही या सप्ताहात त्यांनी खंड न पाडल्याचे दिसत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here