चिपळूण – चिपळूण तालुक्यातील गांग्रई
येथे बिबट्याचे चार बछडे रस्त्यावर फिरत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि संपूर्ण वनविभाग यात सैरभैर झाला असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळते.
गांग्रई येथे चार बिबटे रस्त्यावर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ अनेक youtube चॅनेल्स, सोशल मीडिया, व्हाट्सअप ग्रुप यावर फिरत होता. त्यातच चिपळूण मधील प्रशासनाच्या एका ग्रुपवर हा व्हिडिओ एका जागरूक ग्रामस्थांनी टाकला. त्यामुळे खरोखरच हा व्हिडिओ प्रशासनाच्या ग्रुप वरच पडल्याने याची सत्यता पडताळताना वनविभागाला अवघड गेलं. 24 तास वनविभागाने या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं. मात्र ज्यावेळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावेळी मात्र वनअधिकारी जागे झाले त्यातच रामपूर येथील वनरक्षक राहुल गुंठे यांनी तर कहरच केला ज्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यांना तो व्हिडिओ तुम्ही का प्रसिद्ध केला..?. तुम्ही त्याची शाहानिशा केली होती की नाही. तुम्ही हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्याआधी आम्हाला का नाही विचारले..? वनविभागा बाबत कोणताही व्हिडिओ प्रसिद्ध करताना आम्हाला विचारूनच प्रसिद्ध करा… असे अनेक आदेश व धमकी देणाऱ्या भाषेत विचारणा केली. तसेच ज्या जागरूक नागरिकांनी हा व्हिडिओ प्रशासनाच्या ग्रुप वर टाकला आहे. त्याच ग्रुप वर त्या जागरूक नागरिकांनी 24 तासानंतर तो व्हिडिओ या गावातील नसल्याचे स्पष्टीकरण दिल आहे. मग तुम्ही 24 तास हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी का नाही थांबलात. तुम्ही तो व्हिडिओ प्रसिद्ध का केला असे अजब प्रश्न विचारत गेले. त्यामुळे हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभाग खरोखरच सैरभैर झाले असल्याचे चित्र स्पष्ट झाले. जर वनविभागाला हा व्हिडिओ या परिसरातील नाही. हे जर माहिती होत तर वनविभागाने तात्काळ याबाबत प्रसिद्धीपत्रक का नाही काढलं…?… वनरक्षक राहुल गुंठे जर हे जबाबदार वनरक्षक असतील तर त्यांनी याबाबत प्रशासनाच्या ग्रुप वर तो व्हिडिओ येताच याबाबत तात्काळ कोणती उपाययोजना केली…? त्या व्हिडिओ ची खातरजमा करून आपल्या वरिष्ठांना असा एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय याबाबत कल्पना का नाही दिली. असे अनेक प्रश्न त्या निमित्ताने उभे राहिले आहेत. तर सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये अनेकांनी या परिसरात याआधी बिबटे पाहिल्याचे सांगितले आहे. तर अनेकांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने बिबटे रस्त्यावर आल्याचे म्हटले. त्यामुळे आता वनविभागाने लोकांच्या कमेंट्सकडे लक्ष देऊन या भागातील वृक्षतोड थांबवावी जेणेकरून असे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले तर ते लोकांना खरे वाटणार नाहीत. कारण आता या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने आणि गेल्या अनेक दिवसापासून या भागात बिबट्या दिसत असल्याने या व्हिडिओबाबत गुड वाढत आहे.