मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या ५८ व्या युथ फेस्टिवल स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील डि.बी.जे.महाविद्यालयाने पारंपारीक लोक वाद्यवृंद ( folk orchestra ) मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.

मुंबई फोर्ट येथे मुंबई विदयापिठाच्या इमारतीत हा सोहळा पार पडला सदर स्पर्धेत १५ महाविद्यालयांंनी प्रवेश घेतला होता. लोकवाद्यवृंद स्पर्धेत डि.बी.जे. महाविद्यालयातील अथर्व भेकरे, सम्यक जाधव, संस्कार लोहार, रितेश सुतार,सुदेश सुतार, विनायक शिर्के श्रीराम देवळेकर,साहिल म्हस्के, सोनाली कदम यांनी सादर केलेल्या पारंपारीक वाद्यांच्या सादरीकरणाला गोल्ड मेडल प्राप्त झाले. सदर वाद्यवृंदाला रुपेश धाडवे सह मानस साखरपेकर ,संकेत नवरथ,सुजल लोहार व इतरांनी मार्गदर्शन केले.