जिल्हा परिषद माझी सदस्य नेत्रा ठाकूर शिवसेनेच्या शिंदे गटात करणार प्रवेश, उबाटाच्या शिवसेनेला मोठा दणका

0
474
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गटामध्ये एकतर्फी दबदबा ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य नेत्रा नवनीत ठाकूर यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 27 जुलै रोजी दुपारी तीन वाजता हेदवतड येथील मच्छीमार समाजाचा सभागृहामध्ये पक्षप्रवेशाचा जम्बो कार्यक्रम घेण्यात आला आहे.

नेत्रा ठाकूर यांच्या या पक्षप्रवेशाने गुहागर तालुक्यातील उबाटाच्या शिवसेनेला मोठा दणका बसणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये जरी शिवसेना उबाटाचे आमदार भास्कर जाधव निवडून आले तरी गुहागर तालुक्यामध्ये पडलेले कमी मतदान घातक ठरत चालले आहे. शिंदे सेनेच्या शिवसेनेने राजेश बेंडल यांना उभे करून विद्यमान आमदार भास्कर जाधव जोरदार टक्कर दिली होती परिणामी राजेश बेंडल यांना गुहागर तालुक्यातून लीड मिळाले आहे. या मताधिक्याचा परिणाम सध्या गुहागर तालुक्यावर होत चालला आहे. आपल्या जिल्हा परिषद गटातील आपले सर्व सहकारी व जनतेच्या मागणीनुसार आपण शिंदे सेनेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी सांगितले. रविवारच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याबरोबर कोण कोण असेल हे स्पष्ट होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यामुळे एक मोठी खिंडार उबाटाच्या शिवसेनेला पडणार हे निश्चित झाली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here