बातम्या शेअर करा

रत्नागिरी –  रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी सोमवारी  पदभार स्विकारला. यावेळी बदली झालेल्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

   अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून चंद्रपूर, नागपूर, सातारा, इचलकरंजी येथे काम पाहिलेले आहे. इचलकरंजी हुन बढती मिळून ते बुलढाणा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची रत्नागिरी जिल्हा अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्यावर त्यांनी सोमवारी पदभार स्विकारला. रत्नागिरी जिल्ह्याची सविस्तर माहिती घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here