गुहागर ; या गावातून तोतया आयएएस’ अधिकारी याला पोलिसांनी घेतले ताब्यात

0
1202
बातम्या शेअर करा

गुहागर – भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील ‘आयएएस’ अधिकारी असल्याचे सांगत गुहागर तालुक्यातील जानवळे येथे एक तरुण गेले काही दिवस फिरत होता. मात्र त्याने शिव्यांचा सपाटा लावल्याने काहीजणांना त्याचा संशय आला. मोठ्या बडाया मारणाऱ्या या तोतया पोलीस अधिकाऱ्याचा भांडाफोड झाला.

प्रथमेश शांताराम येवले (२५, रा. औंध, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. अनंत नंदनवन पार्क, जानवळे, गुहागर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून हा तरुण अधिकारी म्हणून फिरत होता. मात्र शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुहागरमध्ये या तोतयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत करत आहेत.

गुहागर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक स्वामिनी नाटेकर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी प्रथमेश शांताराम येवले याने भारत सरकार रक्षा मंत्रालय (थलसेना) येथील ‘आयएएस’ या पदाचे बनावट ओळखपत्र तयार केले होते.
या बनावट ओळखपत्राचा वापर करून या परिसरातील अनेक रहिवाशांना ‘आयएएस’ अधिकारी असल्याची बतावणी करत होता. याच दरम्यान, त्याने या रहिवाशांना शिवीगाळ करून धमक्या दिल्या आणि इथेच त्याचा भांडा फुटल. तो अश्लील शिवीगाळ करत असल्याचे लक्षात येताच चर्चा सुरू झाली. पोलिसांच्या कानावर ही बातमी घालण्यात आली. पोलिसांनी खात्री करताच तो तोतया असल्याचे सांगण्यात आले. अखेर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.या प्रकरणी गुहागर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम २०४ आणि ३३६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here