गुहागर ; अनाधिकृत माती उत्खननावर तहसीलदारांची कारवाई जेसीबी आणि ट्रॅक्टर केला जप्त..?

0
246
बातम्या शेअर करा

शृंगारतळी – गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारतळी येथे सुरू असलेल्या अवैध माती उत्खननावर गुहागर तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारतळी येथे रस्त्याच्या कडेला अहमद केळकर यांच्या जागेत खुलेआम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुहागर तहसीलदारांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, तलाठी सचिन शिंदे यांनी माती उत्खनन सुरू असताना घटनास्थळी धाव घेत जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर जप्त केले. उत्खननाची मुदत संपलेली असतानाही हे काम सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या वस्तूंवर आता तहसीलदार कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here