खेड ; अपघात लपविण्यासाठी फायरिंगचा बनाव 24 तासाच्या आत लागला तपास

0
928
बातम्या शेअर करा

खेड ; मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वेरळ फाटा येथे दोन व्यक्तींनी गोळया झाडल्या आणि हल्ला केला याबाबत खेड पोलीस ठाणे येथे आज तक्रार दाखल झाली होती खेड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेऊन तपास केला असता सदर फायरिंग झाल्याचा बनाव उघड झाला आपण केलेला अपघात उघडकीस येऊ नये म्हणून हा फायरिंगचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई – गोवा महामार्गावर फिल्मस्टाईन पद्धतीने हवेत गोळीबार… परिसरात घबराट

पोलिसांनी यामध्ये अधिक तपास केला असता तक्रारदार व अनोळखी मोटारसायकल चालक यांच्यामध्ये वादविवाद झालेला होता. त्यामध्ये त्यांच्या शिवीगाळ व बाचाबाची झाली. त्यानंतर मोटारसायकल स्वार यांनी तक्रारदार यांच्या गाडीवर दगड फेकून मारला व तेथून निघून गेला. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचा भावाला आपलेवर फायर झाल्याची खोटी माहीती सांगीतली. यापूर्वी तक्रारदार यांनी आपलेवर अनोळखी इसमांकडून फायर झाले असलेबाबत तक्रारी अर्ज पोलीस ठाणे येथे दिलेला होता परंतु तक्रारदार यांच्या तक्रारी अर्जामध्ये कोणतेही तथ्य आढळून आलेले नसल्याने सदरचा तक्रारी अर्ज हा खोटा अर्ज केला म्हणून निकाली काढण्यात आलेला होता.

तरी सदर घटेनच्या अनुषंगाने डायल ११२ प्रणालीवर कॉल करणारे तक्रारदार यांचेवर खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here