गुहागर – गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित व्हावा, यासाठी लढा उभारणाऱ्या शिवतेज फौंडेशनच्या वतीने किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने फटाके आणि पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी शिवतेज फौंडेशन आणि श्री देव व्याडेश्वर देवस्थान तर्फे उपस्थितांना पेढे वाटण्यात आले. यावेळी शिवतेज फौंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दूल भावे, सुहास सातार्डेकर, विकास मालप, प्रभुनाथ देवळेकर, पराग मालप, धनंजय दणदणे, राजू बावधनकर, अमित लांजेकर, राऊत आदीसह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.
गोपाळगड किल्ल्यावर असणारे अनधिकृत बांधकाम आज प्रशासनाने बंदोबस्तात तोडले. त्यामुळे गेल्या अनक वर्षापासून असणारी शिवप्रेमींची मागणी पूर्ण झाली.