बातम्या शेअर करा

चिपळूण -चिपळूण तालुक्यासह खेर्डी मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बिनधास्तपणे चिपळूण, खेर्डी शहरात फिरत आहेत. नुकताच पॉझिटिव्ह आलेला एक रुग्ण स्वाब घेतला असतानाही बिनदिक्कतपणे फिरत होता. काल सोमवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतरही आज मंगळवारी हा रुग्ण चिपळूण व खेर्डी शहरात फिरत असल्याची गंभीर बाब कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन सुद्धा असा रुग्ण जर चिपळूण शहरात फिरत असेल तर हा प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचा जिवंत उदाहरणे आहे. त्यामुळे झाल्या प्रकाराचा संताप व्यक्त करून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने अशा प्रकारांकडे लक्ष दिले नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी थेट मागणी केली आहे.

स्वाब घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला होमक्वारंटाईन किंवा संस्थात्मक होमक्वारंटाईन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे या व्यक्ती फिरत असतात. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्हा आल्यानंतर याचा फटका त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेकांना पॉझिटिव्ह आल्यानंतर होम क्वारंटाईन केले जाते, हे रुग्णही बाहेर फिरताना आढळतात, असे प्रशांत यादव यांनी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. लोटेतील काही कंपन्यांमधील कर्मचारी जे पॉझिटिव्ह आहेत, असे बाहेर फिरताना आढळत आहेत, अशी गंभीर बाब प्रशांत यादव यांनी पुढे आणली आहे. याबाबत आपण तातडीने लक्ष देऊ, खातरजमा करू व योग्य त्या उपाययोजना करू, असे तहसीलदार जयदास सूर्यवंशी यांनी प्रशांत यादव यांना सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here