मुंबई – महाजॉब्स वेब पोर्टलला लाभलेल्या प्रतिसादानंतर आता राज्य सरकारने महाजॉब अँपची निर्मिती केली आहे. यामुळे नोकरीसंदर्भातील माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आज या महाजॉब अॅप्लिकेशनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या वेबपोर्टल आणि अँपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यायांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
महाजॉब्स मोबाईल अँपचे वैशिष्ट्ये
नोकरी शोधणारे आपला प्रोफाइल आणि बायोडेटा काही सोप्या क्लिकसह अपडेट करून अर्ज करू शकतात. ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक माहिती, कौशल्य, अनुभव, कोणत्या जिलह्यात काम करण्याची इच्छा आहे. रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवीन कौशल्ये व इतर माहिती तो भरू शकतो. संपूर्ण माहिती भरलेले प्रोफाइल उद्योजकांना दिसतील.
अँप तसेच अनुभवी यासाठी नोंदणी करू शकतात.
नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामूल्य आहे.
नोकरी शोधणारे मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ज्यामध्ये त्यांना ओटीपी प्राप्त होईल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नोंदणीनंतर वापरकर्ता मोबाईल किंवा इ मेलद्वारे लॉगिन करून आपले प्रोफाइल भरू शकतो.
नोकरी शोधणारे अर्ज केलेल्या नोकरीची स्थिती सहजपणे पाहू आणि ट्रॅक करू शकतात. उद्योजकाने त्याला शॉर्टलिस्ट केले असल्याचे तसेच मुलाखतीनंतर निवड केल्यास त्यासंबंधी अलर्ट पाठविले जातील.