चिपळूण – कोरोनाच्या या कालावधीत कोव्हिडं योद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलिसांना आता कोरोनाची बाधा होत असल्याने चिपळूण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
चिपळूण व अलोरे- शिरगाव पोलीस ठण्यातील दोन पोलिस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातील पोलिसांचे स्वब नमुने तपासणी घेण्याचे काम सुरू झाले आहे तर अलोरे मधील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
चिपळूण शहराबाहेर ग्रामीण भागात ही आता कोरोना पसरू लागला आहे. आणि काल रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात चिपळूण व अलोरे -शिरगाव पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी याना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील इतर सर्व कर्मचारी यांचे स्वब नमुने तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. तर अलोरे येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे तेथेही खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याचे स्वब नमुने घेतले जाण्याचे काम सूर झाले आहे. त्यामुळे चिपळूण सह अलोरे -शिरगाव मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.