गुहागर – भाजपा गुहागर तालुका व श्री दुर्गादेवी देवस्थान गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.तात्यासाहेब नातू स्मृतीदिनी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली श्री दुर्गादेवी देवस्थान सभामंडपात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ६४रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरात १३०जणांची नोंदणी झाली होती परंतु वेळेअभावी ६४रक्तदात्यांना संधी मिळाली.दि.२५जुलै डॉ.तात्यासाहेब नातू, दि.२४जुलै रोजी माजी आमदार कै.रामभाऊ बेंडल पुण्यतिथी, नागपंचमी या तिथीनुसार कै.तात्यामामा खरे पुण्यतिथी असे योग जुळून आलेल्या तसेच गुहागरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तात्या नातूंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे जवळचे मित्र गुहागर पं.स. माजी सभापती,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन कै.सदाशेट आरेकर अशा गुहागरमधील महान व्यक्तींच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली.यावेळी आतापर्यंत ८५वेळा रक्तदान केलेले आबलोली येथील विजय (आप्पा) कदम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस व माजी पं.स.सदस्य विजय भुवड यांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सागर जाधव,अधिपरिचारक प्रभाकर मुळेकर, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी विक्रम चव्हाण, सफाईगार कृष्णा मकवाना,चालक संदिप वाडेकर यांनी रक्त संकलन केले.अडूर गावचे सुपुत्र रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले प्रदिप नार्वेकर यांनी विशेष सहकार्य केले.या शिबीरावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू, उपाध्यक्ष रामदास राणे,नंदू गोंधळी,सौ.निलम गोंधळी,भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे,माजी सभापती दादा अडूरकर,श्री दुर्गादेवी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश भिडे,सचिव संतोष मावळणकर,ट्रस्टी डॉ.बाबा खरे, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय मालप, गुहागर नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, नगरसेवक गजानन वेल्हाळ, अरूण रहाटे, समीर घाणेकर,माजी सभापती सुरेश सावंत, कोकण विकास आघाडी मुंबईचे गुहागर संपर्क प्रमुख श्रीराम विचारे, जयेश वेल्हाळ,नरेंद्र वराडकर,राजेश गोयथळे,संतोष मालप आदींसह भाजपाचे विविध आघाड्यांवर काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिबीर यशस्वी होण्यासाठी रक्तदाते, भारतीय जनता पार्टी गुहागरच्या सर्व कार्यकर्त्यांनी,श्री दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे व सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. शिबीरास्थळी गुहागर शहरातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.