चिपळूण – चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आज महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.
आजची गर्दी बरेच काही सांगून जात आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि मला संगमेश्वर- चिपळूण मतदारसंघातून उमेदवारी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी देखील खंबीर साथ दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सर्वांनी मला आघाडीचा उमेदवार म्हणून स्वीकारले. त्यामुळेच मी आज आघाडीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आजची गर्दी ही महाविकास आघाडीवरचा विश्वास माझ्यावर असलेल्या प्रेमाची साक्ष आहे. जनतेचे हे प्रेम माझ्या विजयाची खात्री देत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रशांत यादव यांनी यावेळी दिली.