रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हयामध्ये मागील ३ महिन्यापासुन विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. महेद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अभिलेखे तपासणीचे काम सुरु आहे. जिल्हयामध्ये ५३ लाख ६६ हजार ७५० इतक्या नोंदी तपासलेल्या असुन त्यापैकी १३० नोंदी कुणबी मराठा व मराठा कुणबी तसेच ४ लाख ६१ हजार ७३० कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या नोंदीवरुन आज अखेर जिल्ह्यात मराठा कुणबी / कुणबी मराठा व्यक्तीना ११ व कुणबी व्यक्तीना ४,०७,४५२ जात प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत.
तालुकानिहाय, तसेच कार्यालयात सापडलेल्या नोंदीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड मराठा कुणबी/कुणबी मराठा 4, कुणबी नोंदी – 5091, दापोली- 12 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी 40576, खेड मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी -27451, चिपळूण 45 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 56026, गुहागर – 1 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी – 46193, संगमेश्वर 0 मराठा कुणबी / कुणबी मराठा, कुणबी नोंदी – 22627, रत्नागिरी मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी 80802, राजापूर 55 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 102143, लांजा 0 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी – 18828 तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय 1 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी – नोंदी-754, शिक्षण विभाग, जि.प. – 0 मराठा कुणबी / कुणबी मराठा, कुणबी नोंदी 51135, जिल्हा सहनिंबधक – 0 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 3073, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी 0 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी 8, 1967 पुर्वीचे सेवा 4 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी 7023. 24 ऑक्टोबर 2023 पासून कुणबी जात प्रमाणपत्रासाठी प्राप्त अर्जाची संख्या 8344 तर कुणबी मराठा/मराठा कुणबी साठी प्राप्त अर्जाची संख्या 11 आहे. यापैकी 24 जानेवारी 2024 अखेर 8295 कुणबी जात प्रमाणपत्र तर कुणबी मराठा/मराठा कुणबी 11 जात प्रमाणपत्र दाखले निर्गमित करण्यात आले आहेत.