वाई पोलिसांची बातच न्यारी….

0
216
बातम्या शेअर करा

वाई -( प्रवीण गाडे ) – काही दिवसांपूर्वी वाई येथील रामचंद्र पांडुरंग जमदाडे यांची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केले होते. वाई पोलीस तपास पथकाने त्यांचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. तसेच शंकर पांडुरंग राजपुरे यांच्या घरात काही दिवसापूर्वी तांब्याची जुनी भांडी तसेच गॅस सिलेंडरची चोरी झाली होती. हाही गुन्हा उघड करून ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही घटनेतील मुद्देमाल मूळ मालकास परत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बिपिन चव्हाण, पोलीस हवालदार अजित जाधव, भाऊसाहेब धायगुडे, पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर, गोरख दाभाडे, हेमंत शिंदे, श्रावण राठोड, नितीन कदम, प्रेम शिर्के, स्नेहल सोनवणे यांनी केली आहे. या कामगिरीचे वाई शहरासह परिसरातून कौतुक होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here