चिपळूण ; मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात

0
1662
बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण जवळील कापसाळ मोरेवाडी येथे आज सकाळी भीषण असा तिहेरी अपघात झाला या अपघातात दोन जण जखमी झाले असून जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

कापसाळा येथील वाशिष्ठी दूध संकलन केंद्रासमोर इनोव्हा, बोलेरो आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
याचवेळी गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत या रस्त्याने प्रवास करत असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला त्यावेळी त्यांनी तात्काळ 100 नंबरला कॉल करून ॲम्बुलन्स ला बोलावले तसेच चिपळूणच्या पोलिसांना या अपघाताबाबत माहिती दिली.

दुचाकीस्वार मोरेवाडी येथील रस्ता क्रॉस करत होता. नेमका त्यावेळी समोरून  वेगाने चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुचाकी आणि इनोव्हा कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की बोलेरो महामार्गावर पलटी झाली. अपघातात जखमी झालेला दुचाकीस्वार चिपळूण तालुक्यातील दळवटने येथील असल्याचे समजते.

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बाईत यांचे पुत्र सचिन बाईत हे सध्या भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तालुकाप्रमुख या पदावर कार्यरत आहे. गुहागर तालुक्यामध्ये सुद्धा अशा अनेक घटनांमध्ये ते मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. आजही कापसाळ येथे झालेला अपघात त्यांच्या निदर्शनाला येतात त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबून मदत केली. सचिन बाईत
यांच्या या कार्याचे सध्या संपूर्ण कापसाळ परिसरातून कौतुक केले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here