गुहागर – गुहागर तालुक्यातील सुरळ येथे यंग बाॅईज स्पोर्ट क्लब सुरळ आयोजित कै.केतन भोसले स्मृतीचषक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा रोख रू ५० हजार रू व चषकाचा मानकरी ठरला तो केतन फायटर्स आबलोली संघ तर उपविजेता ठरला तो मास्टर अविनाश नरवण रोख रू २५ हजार रू व चषकाचा मानकरी ठरला.
सुरळ येथे या स्पर्धा सलग चार दिवस चालल्या या स्पर्धेत अनेक सामने हे मोठ्या चुरशीच्या पार पडले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज (५००रू व चषक) षटकारांचा राजा आणि मालिकावीर (१००० रू व चषक) सुमेद कदम, उत्कृष्ट गोलंदाज (रोख रू ५०० व चषक) अमित पवार आणि अंतिम सामना सामनावीर(५०० रू व चषक) विजय पावले (केतन फायटर्स आबलोली) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शृंगारतळीच्या अर्जुन सकपाळ (स्पोर्ट्स शुज) देऊन गौरविण्यात आले
या स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष सचिन जाधव,सुरळचे माजी सरपंच.महेश्वर बागकर, रोहन भोसले,सुरळ ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आशिष ठाकुर, संजय बागकर ,मनोहर चव्हाण, सुरेश मुर्डेकर, जागामालक संतोष रावणंग,विनोद चव्हाण आणि श्रमिक भाटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी विशेष आणि मोलाचं सहकार्य करणारे रत्नागिरी जिल्हा झी २४ तासचे रिपोर्टर प्रणव पोळेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजपा गुहागर तालुका ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिनेश बागकर, उद्योजक नासिम साल्हे,सुंकाई टूर्स & ट्रॅव्हल्सचे मालक विनायक दणदणे,महाराष्ट्र मेडिकलचे मालक सईद केळकर,चंद्रभागा गॅस एजन्सीच्या मालक सौ.संगिता हळदणकर-भाटकर आदी मान्यवरांनी या स्पर्धेला सहकार्य केलं.तर या स्पर्धेसाठी पंच म्हणून दिलीप मोहिते, कैलास पिळणकर, जगन्नाथ भोसले आणि सुनिल ठाकूर तर समालोचन सुभाष सावंत, प्रमोद गोणबरे आदींनी काम पाहिलं तर हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ भोसले, नईम दळवी व यंग बाॅईज च्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली