महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद चिपळूण मध्ये..

0
1075
बातम्या शेअर करा

चिपळूण – आज घडलेल्या महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद चिपळूण तालुक्यातील उमरोली गावात

शिवसेना पक्षाचे युवासेना उपतालुका प्रमुख प्रितम वंजारे, शिवसेना माजी विभाग प्रमुख विक्रम साळुंखे , युवासेना विभाग अधिकारी शुभम मोरे आणि शिवसैनिक यांनी

कर्नाटक पासिंग सिमेंट भरलेल्या गाडया अडवून

संबंधित कर्नाटकी सरकारचा निषेध नोंदवून गाडी अडवून ठेवली

पुन्हा महाराष्ट्रातील गाड्या कर्नाटक मध्ये अडवल्या किंवा फोडल्या तर त्याचे गंभीर परिणाम कर्नाटकी गाड्या आणि माणसांना भोगावे लागतील अशी सक्त ताकीद दिली ,

आमच्या महाराष्ट्र पेक्षा जास्त गाड्या कर्नाटकच्या महाराष्ट्रात येतात तसेच कर्नाटकी माणसे जास्त इथे वस्त्यावव्यास आहेत

जर ह्या पुढे कानडी सरकारने महाराष्ट्रा द्वेष दखवला तर जशाच तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत अशी भावना व्यक्त केली.

तसेच कर्नाटक पासिंगच्या गाड्यावर जय महाराष्ट्र असे लिहून काही कालावधीनंतर गाड्या सोडल्या

सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर कन्नड वेदिका रक्षण मंचाने महाराष्ट्रातील गाड्यांवर केलेल्या भ्याड हल्ल्याला रामपूर विभाग युवासेनेच्या मर्द मावळ्यांनी उपतालुका अधिकारी प्रितम वंजारेंच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील गाड्यांवर ‘ जय महाराष्ट्र ‘ लिहून आणि भगवा झेंडा फडकवून दमदार प्रत्युत्तर दिले…


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here