गुहागर – गुहागर तालुक्यातील वेळंब येथे कलिंगड लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित केल्याबद्दल व आमच्या शेतकऱ्यांना कलिंगड लागवडीबाबत मार्गदर्शन केल्याबद्दल पंचायत समितीच्या कृषी विभागाचे आभार व्यक्त करून आमच्या शेतकऱ्यांना शेतीबाबत असेच सातत्याने मार्गदर्शन करावे, अशी सुचना सरपंच समिक्षा बारगोडे यांनी यावेळी केली.
तालुक्यातील कलिंगड लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पं.स. गुहागरच्या कृषी विभागाच्या वतीने वेळंब येथील शेतकरी संजय गुरव यांच्या कलिंगड लागवडीच्या प्रक्षेत्रावर कलिंगड लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, उपसरपंच श्रीकांत मोरे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत सदस्य परशुराम गाडे, सुरेश जाधव, जयश्री जाधव, श्वेताली घाडे, वैष्णवी घाडे, प्रगती माळी, प्रिया जाधव, पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे, ग्रामसेवक राठोड, प्रगतशील शेतकरी लक्ष्मण कुंभार, शेतकरी संजय गुरव, संदिप गुरव, विजय माळी, रविंद्र कारकर, चव्हाण, विजय रांजाणे, अनिल देवस्थळी, गोपाळ मोरे, कुणाल बारे, पंकज निर्मळ, मेघश्याम गुरव आदी शेतकरी उपस्थित होते.पंचायत समितीच्या कृषी विभागाला विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी गटविकास अधिकारी व माझे पूर्ण सहकार्य असून अशा नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रयोगातून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यांनी केले. कलिंगड हे पिक इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिकाधिक उत्पन्न देणारे ‘कॅश क्रॉप’ आहे. म्हणून शेतकऱ्यांना या पिकाबद्दल सविस्तर व तांत्रिक बाबींची माहिती होण्यासाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आल्याचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले. यावेळी मढाळ येथील नरेंद्र चव्हाण, कोतळूक येथील लक्ष्मण कुंभार, विजय माळी यांनी कलिंगड लागवडचे वेगवेगळे अनुभव कथन केले. ग्रामसेवक राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.