प्रवाशांना मोठा दिलासा! दिवाळीसाठी एसटीच्या 1494 जादा गाड्या सोडणार

0
42
बातम्या शेअर करा

मुंबई – दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त 1494 जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ही जादा वाहतूक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान चालवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या असून सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही चन्ने यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here