गुहागर – गुहागर तालुक्यातील गिमवी येथील मोरे यांच्या घरातील पारंपारिक दसरा -गवर उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे.

गिमवी गावातील गेली मोरे कुटुंबाच्या चार पिढ्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. हा उत्सव पाच दिवस चालतो. दसऱ्या दिवशी वाजत गाजत मोरे यांच्या घरी देवीचे आगमन केले जाते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पाच विसर्जन केले जाते.
पाच दिवस विविध कार्यक्रम करत हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो असे रमेश मोरे यांनी संगतिले. तर गेली चार पिढ्या आम्ही हा उत्सव तेवढ्यात जोशात आणि रूढी परंपरा जपत करत असल्याचे सुरेश मोरे यांनी सांगितले.