चिपळूणमध्ये वेलनेस क्लब, चिकित्सा केंद्र आणि लॅक्मे सलूनचे उद्घाटन

0
308
बातम्या शेअर करा

चिपळूण – TWJ चिपळूणच्या एका समाजपयोगी आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पाचा म्हणजेच ‘सोशल बिझनेस सेंटर’चा नुकताच शुभारंभ सोहळा पार पडला.

यावेळी TWJ चे संचालक समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांच्याहस्ते हा सोहळा पार पडला. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे चिकित्सा डायग्नोस्टिक सेंटर, वेलनेस क्लब आणि लॅक्मे सलून यांचा समावेश होय. चिकित्सा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्यासंबंधित सर्व चाचण्या ज्यात रक्त, लघवी, ई. पासून ते संप्रेरके, हृदय आणि कॅन्सर संबंधीच्या चाचण्या अनुभवी चिकित्सकांकडून सवलतीत करून मिळणार आहेत. यासाठीचे नमुने रुग्णाच्या घरी जाऊन जमा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. या सर्व चाचण्यावर सुमारे १५ टक्के सवलत उपलब्ध असणार आहे. वेलनेस सेंटरमध्ये व्यक्तीच्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा (जिम) आणि फिजिओथेरपी यांचा मुख्यत्वेकरून समावेश आहे. व्यायामशाळेत सभासद फीमध्ये सध्या ३० टक्केसवलत देण्यात येत आहे. फिजिओथेरपीमध्ये वयोमानामुळे आणि अपघातामुळे निर्माण होणारे संधिवातासारखे विविध आजार, व्याधीपासून रुग्णांची सुटका करून त्यांना पूर्वीचे आरोग्य परत मिळवून देणारे उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये अबालवृद्धासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळणार आहे. येथे अनुभवी व तज्ज्ञ कर्मचारी आणि डॉक्टर रुग्णांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असणार आहेत. या केंद्रामध्ये खास चिपळूणकरांसाठी लॅक्मे सलूनदेखील सुरु होत असून तेथे स्त्री-पुरुष दोघांसाठीही अत्याधुनिक सुविधांसह सौंदर्यउपचार उपलब्ध असतील. अशा प्रकारचे सलून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच चिपळूणमध्ये सुरु होत आहे. या शुभारंभ सोहळ्याला चिपळूणमधील अनेक सन्माननीय नागरिकांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिकित्सा डायग्नोस्टिकच्या प्रमुख डॉ. श्रद्धा घाग, लॅक्मे सलूनच्या व्यवस्थापक माहेश्वरी पाटणे व सिद्धी कदम, वेलनेस सेंटरचे व्यवस्थापक सिद्धेश कदम, TWJ इव्हेंटचे संचालक प्रतिक जासूतकर, TWJ फॉउंडेशनचे व्यवस्थापक श्रीपाद खेर आणि TWJ च्या अनेक पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांचा चिपळूणकरांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन TWJ चे संचालक समीर नार्वेकर यांनी यावेळी केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here