चिपळूण पॉवर हाऊस येथे ट्रकखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
3358
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे दुचाकीस्वाराचा ट्रकखाली सापडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची शनिवारी धक्कादायक घटना घडली. हा अपघात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. किरण कृष्णा घाणेकर, असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रोलरने खड्डे बुजवित असतांना ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेतल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यात यावी, यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलने केली. पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. या अनुषघाने गेल्या दोन दिवसापासून चिपळूण शहरात खड्डे बुजविण्याच्या कामास सुरवात झाली. शनिवारी पाग पॉवर मार्गावर खड्डे बुजवविण्याचे काम सुरू होते. दरम्यान लोटे दिशेकडून कोंडमळ्याकडे जाणारा दुचाकीस्वार पाग पॉवर हाऊस येथे आला असता समोरून येणाऱ्या ट्रकखाली तो सापडला. या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या तरूणाने हेल्मेट घातलेले असतानाही त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरूणाचा मृतदेह कामथे उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. किरण हा लोटे येथील कंपनीत नोकरीस होता. त्याच्या पश्चात पत्नी, लहान मुले, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. महामार्गावरील खड्ड्यामुळे काही महिन्यापुर्वी बहादूरशेखनाका येथे भोम येथील तरूणीचा डंपरखाली सापडून मृत्यू झाला होता. तर कामथे येथेही अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरूणाचा मृत्यू झाला होता.
पॉवर हाऊस येथे खड्डे बजवताना ठेकेदार कंपनीने देखरेखीसाठी माणसे ठेवली नव्हती. एकीकडे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूने वाहतूक सुरू राहील्याने हा अपघात घडला. सबंधीत तरूणाची कोणतीही चुकी नव्हती. दुचाकीचा वेगही खूप कमी होता. तरी देखील निव्वळ खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारे कामथे गावचे माजी उपसरपंच प्रदीप उदेग यांनी दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here