महामार्गावरून जाताना अंगावर चिखल उडाला अन संतप्त नागरिकांने खड्ड्यातच साबण लावून धुतला शर्ट!

0
306
बातम्या शेअर करा

चिपळूण – रक्षा बंधनासाठी मुंबई गोवा महामार्गावरून जाताना अंगावर चिखल उडाला आणि संतप्त नागरिकांनी त्या खड्ड्यातच साबण लावून शर्ट धुवून प्रशासनाचा आगळावेगळा निषेध व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चिपळूण शहरात उड्डाण पुलाचे काम सुरू असून दोन्ही बाजूला सर्विस रोड तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच डांबरीकरणाची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर चिखलमय परिस्थिती निर्माण झाली असून वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा मोठ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडत आहे. आज सकाळी चिपळूण शहराकडून खेर्डीच्या दिशेने जाणाऱ्या पादचाराच्या अंगावर बहादूरशेखनाका येथे चिखल उडाला आणि तो पादचारी संतप्त झाला. या पादचाऱ्याने तेथील खड्ड्यातच साबण लावून शर्ट धुवून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. गोवळकोट येथील सतीश कदम असे या पादचाऱ्याचे नाव आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का ? असा सवाल उपस्थित होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here