गुहागर – ठाणे धावत्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळले.

0
525
बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण वालोपे येथे धावत्या शिवशाही बसचे अचानक पुढील चाक निखळल्याचा प्रकार आज सकाळी घडला.सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले.

या प्रकाराने बसमधील प्रवाशांनी गुहागर आगाराच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.गुहागर आगाराची आज रविवारी सकाळी 11 वाजता गुहागर – ठाणे ही शिवशाही बस गुहागरमधून रवाना झाली.ही बस दुपारी १२.३० च्या सुमारास चिपळूण वालोपे येथे आली असताना धावत्या बसचे पुढील चाक अचानक निखळले.त्यामुळे बस एका बाजूला झुकली.प्रसंगावधान राखून चालकाने बसमधून उतरुन लगेच प्रवाशांनाही बाहेर काढले.हा रस्ता समांतर असल्याने बसला कोणताही धोका पोहचला नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.मात्र पुढे काही अंतरानंतरचा प्रवास हा परशुराम घाटातून होता. जर ही घटना त्या घाटात घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती काही प्रवाशांनी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित कामचुकारपणा करणाऱ्या त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गांमधून आणि नागरिकांमधून केली जात आहे. तर मेंटनस न केलेली गाडी ज्यांनी या मार्गावर पाठवली त्या आगारप्रमुखांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here