गुहागर; मुसळधार पावसाचा तडाखा; शृंगारतळी बाजारपेठेत शिरले पाणी, तर आरे पुलावरूनही पाणी

0
324
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यात गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने रविवारी चांगलेच रौद्ररूप धारण केले.मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या संपुर्ण तालुक्याला चांगलेच झोडपले.

रविवारी सरासरी 74 मिमी इतका पाऊस पडल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे. तालुक्यातील आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत गटारांचे योग्य नियोजन न झाल्याने दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले तर पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील अनेक ठिकणी नद्यांना पूर आला आणि पाणी पातळी कमालीची वाढली.तर अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याचे पहावयास मिळाले. काही भागात रस्त्यांना गटारांचे योग्य नियोजन नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले.पेवे गावातील मादाली नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असुन येथील आरोग्य उपकेंद्र परिसराला पाण्याने वेढा घातला आहे. तर कोतळूक येथील कासारी नदी प्रथमच पत्राबाहेर आली व यामुळे नदिलगतची शेती पाण्याखाली गेली आहे.तर पालशेत पुलावरून देखील पाणी जात असून वाहतूक खोळंबली आहे.साखरीत्रिशूळ कोडबा गुरववाडी रस्त्यावर दरड कोसळल्याने व मोरी खचल्याने येथील वाहतूक बंद झाली. तर आरेपुलावरून पाणी जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.असगोली रस्त्यावर देखील पाणी आल्याने येथील शेती पाण्याखाली गेली. रविवारी गुहागर मंडळात 70 मिमी,पाटपन्हाळे मंडळात 62 मिमी,हेदवी मंडळात 79 मिमी,आबलोली मंडळात 104 मिमी,तळवली मंडळात 55 असा एकूण 370 मिमी पाऊस झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली तर सरासरी 74 मिमी इतका पाऊस झाला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here