चिपळूण – मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे या परशुराम घाटातील रस्ता बंद झालेला होता. मात्र आताकोकणात अतिवृष्टी सुरू असल्याने या घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता मोठया प्रमाणात आहे.
तसेच 09 जुलै 2022 रोजी पर्यंत हवामान खात्याकडून जिल्हयासाठी रेड अलर्ट जाहिर झाला असल्याने या कालावधीत या घाटात दरडी कोसळून जिवीत हानी होवू नये याकरीता 06 जुलै 2022 पासून 09 जुलै 2022 रोजी पर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.याबाबतचा असा अहवाल कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण व रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडे सादर केलेला आहे.त्यामुळें आता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे असे आदेशित केले आहे. तथापि, बंद कालावधीत केवळ कमी वजनाची (Light Vehicle) वाहतूक ही चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.