गुहागर ; वडील रागवल्याने विद्यार्थ्यांने गळफास घेऊन संपवले जीवन

0
117
बातम्या शेअर करा

गुहागर- शाळेत जाण्यावरुन वडील रागावले म्हणून गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले. ही घटना काल मंगळवारी रात्री घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की गुहागर पोलीस ठाण्यात विकास पालशेतकर यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांचा मुलगा पारस विकास पालशेतकर (वय 15) सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल वेळणेश्वरमध्ये इयत्ता 9 वी ला शिकत होता. तो शाळेत जाण्यास तयार नव्हता. मी शाळेत जाणार नाही, मला शिकायचे नाही असे तो वारंवार सांगायचा. मंगळवारी सायंकाळी शाळेत जाण्याच्या मुद्द्यावरून विकास पालशेतकर पारस वर रागावले. त्याचा राग येवून पारस घराच्या माळावरील एका खोलीत जावून बसला. रुसलेला पारस थोड्यावेळाने खाली येईल, असे समजून घराच्यांनी दुर्लक्ष केले.बराच वेळ झाला तरी पारस माळ्यावरुन खाली आला नाही, म्हणून समजूत काढून त्याला घरात बोलवण्यासाठी वडिल विकास माळ्यावरील खोलीत गेले. तेथील दृष्य पाहून विकास यांना धक्का बसला. पारसने खोलीतील लोखंडी अँगलला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. वडिलांनी तातडीने दोरीच्या विळख्यामधून पारसला सोडवले. त्याला उपचाकरीता हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून गेले. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पारसला मृत असल्याचे घोषित केले.या प्रकरणी गुहागरचे पोलीस निरीक्षक बी. के. जाधव करत आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here