बातम्या शेअर करा

चिपळूण – केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. त्यामध्ये मूळची चिपळूणची असलेल्या प्रियंवदा म्हाडदळकरने गुणवत्ता यादीत 13 वी रँक मिळवली आहे.
व्हीजेटीआय कॉलेजमधून प्रियंवदाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेत एमबीएचा शिक्षण पूर्ण केला. खासगी क्षेत्रात नोकरी करत असताना चांगल्या संधी मिळत होत्या. मात्र असे असताना सुद्धा प्रियंवदाने प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले व त्यासाठी मागील दोन वर्षापासून परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. ती राज्यात पहिली आली आहे.

खेड तालुक्यातील तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय संजय महाडिक तसेच रत्नागिरीच्या चेतन पंदेरे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली आहे. यात अक्षयने देशात 212 वी तर रत्नागिरीच्या चेतन पंदेरे याने 416 व रँक मिळवली आहे.
खेड तालुक्यातील सर्वसाधारण कुटुंबातील अक्षय संजय महाडीक याची आई सौ.नेहा संजय महाडीक खेडमधील नातूनगर येथील जि.प.शाळेत प्राथमिक शिक्षिका असून व वडील संजय महाडीक हे कृषी विभागात कार्यरत आहेत. त्याचे मुळगाव दापोली तालुक्यातील माटवण आहे. अक्षय याचे बारावी पर्यंत शिक्षण खेडमध्ये झाले आहे. शैक्षणिक वाटचालीत यापूर्वी अक्षय याने कोकण बोर्डातून इयत्ता दहावी व बारावी विज्ञान पर्यंतचे शिक्षण ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या विद्यालयात पूर्ण केले आहे.

रत्नागिरीच्या चेतन पंदेरे या मुलाने या परीक्षेत बाजी मारली आहे. या निकालात चेतन पंदेरे याला 416 व रँकिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे पोलिस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणार्‍या नितीन पंदेरे यांचा मुलगा असून त्याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पोलिस खात्यात काम करणार्‍या कर्मचार्याच्या मुलाने यूपीएससी मध्ये यश मिळवण्याची कोकणातील ही पहिलीच घटना आहे. युपीएससी परीक्षेमध्ये चेतन पंदेरे यांला 416 व रँकिंग मिळाले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here