चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील परशुराम घाट आज रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे राष्टीय महामार्ग उपविभाग मार्फत जाहीर करण्यात आले आहे.
परशुराम घाटात रस्ता चौपदरी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना आवश्यक ती खबरदारी म्हणून हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे.घाट बंद असताना या घाटातील दरड प्रवण क्षेत्र आणि ज्या संभाव्य दरडी कोसळण्याची शक्यता आहे असा भाग हटवण्यात येणार आहे. रात्रभर युद्धपातळीवर काम सुरू करून हा घाट पूर्णत्व करण्याचा प्रयत्न सुरू राहील हा घाट बंद असताना अवजड वाहतूक चिपळूण -कराड मार्गे वळविण्यात आली असून हलकी लोटे चिरणी मार्गे वळविण्यात येणार आहे.