गुहागर – गुहागर तालुक्यातील तळवली प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणाऱ्या सहा आरोग्य उपकेंद्र मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी रुग्णसेवेसाठी दाखल झाल्याने आता या नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणार आहे
भारत सरकारच्या आयुष्यमान भारत आरोग्य वर्धनी या योजनेअंतर्गत तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सहा आरोग्य उपकेंद्रासाठी सहा समुदाय आरोग्य अधिकारी हजर झाल्याची माहिती तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज देशमुख यांनी दिली
तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा आरोग्य उपकेंद्र येतात त्यामध्ये गिमवी ,पालपेणे, पवारसाखरी, पेवे, पांगारी, वडद या ठिकाणी या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे. हे अधिकारी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी त्या गावातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देतील आणि दुपारनंतर आरोग्य उपकेंद्र अंतर्गत जी इतर गाव येतात त्या गावातील नागरिकांना घरभेटी देऊन त्यांच्यावर प्राथमिक प्रथम उपचार करतील तरी नागरिकांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे समुदाय आरोग्य अधिकारी या सहा उप केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील जवळपास वीस हजार नागरिकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.सकाळी ९ ते दुपारी १२.३० उपकेंद्र मध्ये कामकाज करतील तर दुपारी १.३० ते ५.०० कार्यक्षेत्रात गृहभेटी देतील.