गुहागर – गुहागर तालुका वकील संघाची पंचवार्षिक निवडणूक आज दि.२५ जानेवारी रोजी झाली. यावेळी अध्यक्षपदी संकेत साळवी, उपाध्यक्षपदी मयूर कानसे तर सचिवपदी सुशील गणपत अवेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या संघ निवडीत सहसचिवपदी दिनेश विचारे, खजिनदार सौ. पूनम साळवी, सह खजिनदार संजोग सावंत, विशेष सल्लागार मंगेश मधुकर जोगळेकर, सौ. मनाली आरेकर, प्रकाश पवार, सदस्यपदी गिरीष शेंबेकर, मयुरेश पावसकर, जगदीश सकपाळ, अमृता मोरे, ज्योत्सना चांदोरकर, राहूल चाचे, संपदा चाचे, अद्वैत खरे यांची एकमताने निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकारी व सदस्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.