पालघर – (रामेश्वरी आहेर )- वाडा येथील वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स मधील बी.ए.एम.एम.सी विभागातर्फे ऑनलाइनच्या माध्यमातून मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांत पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पत्रकारिता अभ्यासानंतर च्या शासकीय क्षेत्रातील संधी या विषयावर महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पत्रकारिता करीत असताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात याबाबत ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कादिर यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धात्मक माध्यमातील करिअरच्या संधी याविषयावर युक्ती मिडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
वाडा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांकरिता खुले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार मंडळी देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते. अनेकांच्या प्रश्नांना मान्यवरांनी मुद्देसूद उत्तरे देऊन शंका निरसन केले.यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा रंगला होता. मराठी पत्रकार दिवस ऑनलाईन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे ट्रस्टी योगेश गंधे, प्राचार्य विशाल सावंत, आणि इतर शिक्षकवर्ग यांनी सहकार्य केले.