गुहागर आगार प्रमुखांचा अजब कारभार , विना-वाहक रोज धावते गुहागर चिपळूण मार्गावर बस

0
818
बातम्या शेअर करा

गुहागर– (विशेष प्रतिनिधी )- राज्यभरात एसटीचा संप जवळपास 56 दिवसापासून सुरु आहे. मात्र याच वेळेला आपल्या गुहागर डेपोतून एसटी बस सुरू आहे. हे दाखवण्यासाठी गुहागरचे आगारप्रमुख मात्र अनेक आटापिटा करताना दिसतात. ते चक्क विना-वाहक, विना-थांबा गुहागर ते चिपळूण मार्गावर बस चालवत असल्याने एसटीला हा तोटा सहन कसा होतो ? एवढ्या तोट्यात एसटी चालवली कशी जाते ? याचाच प्रश्न अनेक एसटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना सुद्धा पडला आहे.

राज्यभरात गेल्या दोन महिन्यापासून एसटीचे कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरण करा या मुद्द्यावर संप करत आहेत. या संपात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आगारातील जवळपास सर्वच कर्मचारी संपात आहेत. असे असताना मात्र संपाच्या सुरुवातीच्या काही दिवसानंतर एक चालक हा कामावर हजर झाला त्या चालकाला काम देण्यासाठी गुहागरचे विद्यमान आगार प्रमुख हे विना-वाहक गुहागर ते चिपळूण ,व चिपळूण ते गुहागर अशी गाडी चालवतात. यावेळी या गाडीवर वाहक नसतो या गाडीत गुहागर आणि शुंगारतळी या ठिकाणी जे प्रवासी बसतील त्यांना तिकीट काढून दिलं जातं आणि पुढे ही गाडी विना-वाहक म्हणजे ना कुठल्या प्रवाशाला गाडीत घेतलं जातं ना कुठला नवीन प्रवासी गाडीत बसू शकतो अशी अट ठेवून हे गाडी चिपळूण पर्यंत पाठवली जाते. त्यानंतर पुन्हा चिपळूण वरून गुहागरकडे येताना चिपळूण बस स्थानकावर बस मध्ये बसलेल्या प्रवाशांचे तिकिट येथील वाहक काढून देतो आणि पुढेही गुहागर येईपर्यंत तसंच विना-वाहक ही बस गुहागरकडे येथे त्याच वेळी वाटेत कुठल्याही प्रवाशांची चढ-उतार केला जात नाही. फक्त चिपळूण बस स्थानकात जे प्रवासी बसले आहेत त्यांनाच उतरण्याची परवानगी असते. चालकाला नवीन प्रवासी घेता येत नाही. असे जवळपास गेले चाळीस दिवस अशीच गुहागर -चिपळूण मार्गावर गुहागर आगारातून एकच बस सुटत आहे.एक तर एसटी अनेक प्रकारे तोट्यात आहे. अनेक प्रकारे आर्थिक संकटात आहे. असे असताना मात्र गुहागरचे आगारप्रमुख एवढा तोटा सहन करून ही बस नक्की का चालवतात ? असा प्रश्न आता सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांसह अनेक स्थानिकांना सुद्धा पडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी आधीच तोट्यात आहे. त्यातही गुहागर आगाराचे आगारप्रमुख एका वाहकाला नोकरी देण्यासाठी आपला मनमानी कारभार करत एसटीला दररोज हजार रुपये खड्ड्यात घालत लाखो रुपयांची उधळण करत ही बस चालवत आहेत.असे असताना आता या आगारप्रमुख वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का ? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण याच आगार प्रमुखांनी गुहागर आगारातील ज्या चालक-वाहक यांनी कमी उत्पन्न आणलं …..ज्या चालकांनी कमी कॅपिटल आणलं ……किंवा जी बस उत्पन्न देत नाही म्हणून बंद केली. त्याच आगार प्रमुखांवर आता एसटीचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याचीच चर्चा सध्या एसटीतील अनेक कर्मचारी खाजगीत बोलताना दिसत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here