अनंत गीते आज चिपळुणात सेनेमधील कुणबी समाज्याची नाराजी यावर काय बोलणार ?

0
641
बातम्या शेअर करा

चिपळूण — (विशेष प्रतिनिधी ) – माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते आज चिपळूण मध्ये येत आहेत.गेल्या महिन्यात श्रीवर्धन मध्ये शरद पवार यांच्यावर केलेली टीका आणि नुकताच दापोलीतील कुणबी समाज्याचे नेते व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अनंत गीते कोणती राजकीय भूमिका मांडतात याकडे आज राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

रत्नागिरी आणि रायगड या दोन लोकसभा मतदार संघातून सलग सहावेळा निवडून आलेले अनंत गीते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत झाले.या पराजयापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन मध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.पवार हे आमचे नेते कधीच होऊ शकत नाहीत आमचे नेते फक्त बाळासाहेब ठाकरे.राज्यातली महविकास आघाडी ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे.रायगड लोकसभा मतदारसंघ कुणाला अंदन दिलेला नाही असं सांगून आपण अजून मैदान सोडले नसल्याचे गीते यांनी स्पष्ट केले.उद्या या आघाडीत बिघाडी झाली तर कोलाड सुतारवाडीत जाणार का ? असा रोकडा सवाल त्यांनी केला.रायगड मध्ये आपले प्रतिस्पर्धी सुनील तटकरे यांच्या विरोधात गीते यांनी जोरदार रान उठवले असताना याच मतदारसंघातील दापोलीतील गीते यांचे एके काळचे जवळचे सहकारी शंकर कांगणे,संदीप राजपुरे,दत्ता गोठल यांनी तटकरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत प्रवेश करून गीते याना धक्का दिला आहे.याच दरम्यान पालकमंत्री ना.अनिल परब यांच्या विरोधात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.गीते यांचे एके काळचे पक्षातील विरोधक आणि नंतरचे मित्र रामदास कदम आज अडचणीत आले आहे. त्यामुळे गीते यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्याच्या नजरा लागल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here