गुहागर – गुहागर तालुक्यातील तवसाळ येथील गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असणारा विजयगड किल्ला. या किल्ल्यावरती विजयादशमीचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान – हिंदुस्तान, गुहागर विभाग आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने विजयादशमीच्या मुहूर्तावर दुर्ग पुजन करण्यात आले. यावेळी छत्रपतींच्या पुर्णकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून किल्ले विजय गडावरती पुष्पमाळांची आरास करून मोठ्या उत्साहात दुर्ग पूजन करण्यात आले. यावेळी तवसाळ ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप सुर्वे,उपसरपंच प्रसाद सुर्वे, रत्नदीप गडदे, प्रणय सुर्वे,अमोल सूर्वे,प्रीतम सूर्वे, जयेश गडदे, पुष्पराज सुर्वे, संकेत गंधेरे,मनोज कांबळे, महेश सुर्वे आदी प्रमुख ग्रामस्थांसह सह्याद्री प्रतिष्ठानचे चंद्रकांत चांदोरकर, जोत्स्ना चांदोरकर, अंकिता चांदोरकर ,किरण पोमेंडकर, नयन चांदोरकर, धनश्री चांदोरकर, नितेश चांदोरकर, प्रमोद आग्रे, प्रथमेश अवेरे,चंद्रकांत शिंदे,शैलेश भुवड आधी दुर्ग सेवक उपस्थित होते. विजयादशमीच्या मुहूर्तावर तवसाळ येथील विजय गडावर झालेले दुर्गापूजन हे ग्रामस्थ बंधू-भगिनी आणि शिवप्रेमींच्या मध्ये चैतन्य निर्माण करणारे होते.