खेड ; प्रधानमंत्री आवास योजनेत लाखो रुपयांचा अपहार..

0
287
बातम्या शेअर करा

खेड – खेड तालुक्यातील अनासपुरे गावात तळघर ग्रामसेवकानेच प्रधानमंत्री आवास योजनेत लाखो रुपयांचा अपहार केल्याची चर्चा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधून देतो सांगून वृद्ध महिलेच्या खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील तळघर – अनासपुरे गावात प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याची जबाबदारी
असलेल्या ग्रामसेवकाने गावातील या योजनेची लाभार्थी असलेल्या एका वयोवृद्ध आजीला फसवल्याची तक्रार तिच्या नातवाने केली आहे. आज्जीच्या बोटांचे ठसे घेऊन तिच्या बँक खात्यात शासनाकडून जमा झालेले तब्बल १ लाख २० हजार रुपये ग्रामसेवक महाशयांनी परस्पर काढून घेतल्याची तक्रार संदीप सुरेश डाऊल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकायांकडे केली आहे. या तक्रारीनंतर खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत आता या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. तक्रारदार संदीप डाऊल यांनी केवळ आपल्याच आजीची नाही तर त्या वर्षी गावात मंजूर झालेल्या २७ घरकुलांमध्ये देखील अशाच प्रकारे पैशांची अफरातफर केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

खेड तालुक्यातील तळघर- अनसपुरे येथील संदीप डाऊल यांनी घरकुलाची १ लाख २० हजारांची रक्कम ग्रामसेवकाने हडप केल्याच तक्रार जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकार अधिकारी यांच्याकडे दिली आहे. वरिष्ठांनी याची दखल घेत उच्चस्तरीय चौकशी सुरु केली आहे, तसेच आपल्याला आलेल्या आदेशाप्रमाणे आपण प्राथमिक चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती. पंचायत समिती खेडचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी माध्यमांना दिली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here