गुहागर ; तवसाळ खाडीत बुडून मृत्यू

0
268
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील तवसाळच्या समुद्रकिनारी आज एक मृतदेह सापडला. हा मृतदेह सुनिल गजानन सुर्वे (वय. 43), रा. तवसाळ खुर्द भंडारवाडा यांचा असल्याचे समोर आले असुन ते 22 तारखेपासून बेपत्ता होते.

सुनिल सुर्वे 22 सप्टेंबर रोजी बोटीतून खाडीत पडले होते. नातेवाईकांनी या संबंधीची खबर 22 सप्टेंबरला गुहागर पोलीस ठाण्यात दिली होती. गेले दोन दिवस तवसाळ मधील ग्रामस्थ सुनिल सुर्वे यांचा शोध घेत होते.अखेर आज तवसाळ समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभुमीजवळ मनुष्याचा मृतदेह आला असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. म्हणून ग्रामस्थ घटनास्थळी गेले तेव्हा सदर मृतदेह सुनिल सुर्वे यांचाच असल्याची ओळख पटली. तवसाळ खुर्द येथे रहाणारे संतोष सुर्वे यांनी याची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करुन पोलीसांनी सुनिल सुर्वे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कादवडकर करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here