माळशिरस ; गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता – रणजित सूळ

0
150
बातम्या शेअर करा

माळशिरस-(प्रगती सिडवाडकर) माळशिरस तालुक्यामध्ये सर्व निवडणूका स्वबळावर लढविणार असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाने केला आहे. माळशिरस मधील मेरिडियन हॉटेल मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस नुतन तालुकाध्यक्ष वैजिनाथ पालवे यांचा सत्कार सोलापूर जिल्ह्या प्रभारी रणजित सूळ यांच्या हस्ते करण्यात आला. येणाऱ्या निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था ‘या’ निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. पक्ष आणि संघटन मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता तयार करणार असल्याचे या बैठकीमध्ये सर्वांना सांगण्यात आले.
संघटन मजबूत करण्यासाठी येणाऱ्या आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून गावोगाव वाड्या-वस्त्यांवर शाखेच उदघाटन केलं जाणार आहे.

पक्षाचे सक्रिय सभासद 100 असुन एका महिन्यामध्ये 30 हजार सक्रिय सभासद पूर्ण करून पुढील वाटचाल ही सुरू करू असा दावा पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये केला. या वेळी बैठकीमध्ये सोलापूर प्रभारी रणजित सूळ, जेष्ठ नेते दत्तात्रय कोकरे, सतीश कुलाळ, तालुका अध्यक्ष वैजनाथ पालवे, अँड. सिताराम झंजे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here