आबलोली- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन गुहागर तहसीलदार लता धोत्रे यांना देण्यात आले.
ओबीसी आरक्षण, जात निहाय जनगणना आदी प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील विविध भागांतून कोरोना नियमांचे व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत तेली समाज एकवटला होता.यावेळी प्रसिद्धी प्रमुख अमोल पवार यांनी उपस्थित समुदायाला आंदोलना मागची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष शशिकांत पवार यांनी आंदोलनाची गरज आणि पुढील पिढीसाठी असणारे महत्व विशद केले. कोकण प्रांत सचीव चंद्रकांत झगडे यांनी आगामी काळात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातुन ओबीसी आरक्षण,जात निहाय जनगणना याबाबत घ्यावयाची भुमिका, आंदोलनाची दिशा याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल पवार, तालुका अध्यक्ष शशिकांत पवार, उपाध्यक्ष अनिल रहाटे, महिला आघाडी अध्यक्षा दिव्या किर्वे, युवक अध्यक्ष प्रितम रहाटे, एकनाथ रहाटे, प्रकाश झगडे, प्रदीप पवार, विश्वनाथ रहाटे, नितीन खानविलकर,हरीश्चंद्र रहाटे, विनोद महाडिक, गणेश किर्वे, राजेश महाडिक यांसह तालुक्यातील तेली समाज बांधव उपस्थित होते.प्रदिप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.