राजापूर ; तोक्तेने हादरवलं, आमदारांनी सावरलं ……

0
85
बातम्या शेअर करा

राजापूर -राजापुर तालुक्यातील वाडापेठ कालिकावाडी येथे आईबापाविना पोरकी झालेली पुजा पांडूरंग साळवी ही आपल्या दोन भावंडासह परिस्थितीशी दोन हात करीत राहते. तोक्ते वादळाने संबंध कोकणाला तडाखा दिला आणि तोक्तेच्या तडाख्यात पुजाच्या घराचे छप्पर हरवले.

आमदार राजन साळवी तोक्ते वादळादरम्याने राजापुर सागरी किनारपट्टींजवळील गावांना भेट देवुन नुकसानीचा आढावा घेत फिरत असताना जिल्हा परिषद सदस्य दिपक नागले यांनी सदरची घटना आमदार राजन साळवी यांच्या कानावर घातली. आमदारांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता पुजा साळवी यांच्या घराला भेट देेवुन घटनेला चोवीस तास होणेपुर्वीच पुजा साळवी यांच्या घरावर नवे छप्पर घालुन दिले.

कोकणातील दमदार आमदार म्हणुन ओळख असलेल्या,जनतेच्या अडीअचणीत धावुन जाणा-या आमदार राजन साळवी यांनी तोक्ते वादळादरम्याने सागरी गावांना भेटी देवुन अडीअडचणी समजावुन घेवुन योग्य ती मदत करीत आदर्श लोकप्रतिनिधी म्हणुन पुन्हा आपली चुणुक दाखवली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here