वादळा नंतर कोकणचे दौरे करण्याच्या तयारीत असलेल्या सर्व मंत्र्यांना कळकळीची विनंती…

0
577
बातम्या शेअर करा

.लक्ष्मीकांत घोणसेपाटील 9890693214

साहेब सध्या आम्ही कोरोना महामारीतून बाहेर आलेलो नाही.त्यात मागच्या वर्षी निसर्ग वादळाने आम्हाला दिलेला धक्का आम्ही त्यातून सुद्धा सावरलो नाही तर उद्या अजून एक वादळ आमच्या कोकणात येणार आहे.वादळ येईल आणि जे काय करायचं ते करून जाईल शेवटी ती नैसर्गिक आपती आहे आपण किती काही केलं तरी त्या वादळाला थांबऊ शकत नाही.

वादळ झाल्यानंतर आमचं जे काही नुकसान होईल त्यासाठी मदत म्हणून शासनाकडून आम्हाला मदत मिळेल आणि ती मदत ( तुटपुंजी ) किती द्यायची हे ठरलेलं असते. हे सगळं ठरलेलं असताना सुद्धा आमच्या जखमेवर मीठ चोलायला आपण जे येता ना ते साहेब कृपा करून येऊ नका कारण का तुम्ही येणार म्हणून जी शासकीय यंत्रणा आम्हाला मदत करायला तयार असते ना ती तुम्हाला तुमच्या पाठी लागते कशाला तर फक्त गाड्यांचा ताफा वाढवायला.पण तुमच्या हे अजिबात लक्षात येत नाही की या लोकांना आपल्या मागून फिरवण्या पेक्षा यांना यांची काम करू देत जेणेकरून सर्व सामान्य माणसाला त्याची मदत होईल.

दुसरा विषय आपण येता मग काही मुंबई,पुणे,कोल्हापूर,बारामती येवढ्या लांबून आपण येता.येताना आपल्या सोबत आपले शकडो कार्यकर्ते येतात.ते सर्व मंत्र्या सोबत असतात त्यामुळे त्यांचं वागणं हे काही और असत.बर ते कायम तुमच्या सोबत असल्यामुळे ते कायम वेगवेगळ्या लोकांच्या सहवसात येतात आणि अश्या लोकांमुळे कोकणात आटोक्यात आलेली कोरोना ची परिष्टिती अजून हाताबाहेर जाऊ शकते. मंत्री महोदय आम्ही फक्त आपल्याला विनंती करू शकतो.काय करायचं ते तुमचं तुम्ही करणार आहातच पण आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे खरंच जर कोकण वासियांसाठी आपल्याला काही करायचं असेल ना तर ते तुम्ही तुमच्या बसल्या जागेवरून सुद्धा करू शकता.जागेवर झालेली दुर्दशा पाहून ( शासकीय पंचनामे ) त्यांच्या झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई कशी देता येईल ते बघा.ज्यांची घर उध्वस्त झाली असतील ती कमीत कमी वेळेत कशी बांधून देता येईल ते बघा.वादळामुळे पडलेले लाईट चे पोल लवकरात लवकर कसे बसतील आणि लोकांच्या घरी लाईट कशी पेटेल ते बघा.

आणि हे सर्व आपण जिथे आहात तिथून करू शकता.उगाच आमच्या नशिबात आलेल्या या संकटांच राजकारण करत बसू नका कारण तुमच्या राजकारणात बळी मात्र आजपर्यंत आमचाच गेला आहे.त्यामुळे या वेळेस तरी आम्हाला झालेलं नुकसान मिळेल एवढच करा साहेब

आपलाच…
कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असलेला कोकणी माणूस


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here