मुंबई – आज महाराष्ट्रात ७ हजार ७४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंतच्या करोना रुग्णांची संख्या २ लाख ६४ झाली आहे. यापैकी ८३ हजार २९५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ३३९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८ हजार ८२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८ हजार ८२ इतकी झाली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५४.०२ टक्के इतका झाला आहे.