रत्नागिरी : रत्नागिरीतील कंपन्याना कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरडा, सुप्रिया केमिकल्स आणि फिनोलेक्सने चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र जेएसडब्ल्यू, गद्रे मरीन आणि एमआयडीसीतील काही कंपन्यांनी अद्याप काही केले नाही. ज्या कंपन्या कोविड सेंटर सुरू करणार नाही त्या कंपन्या बंद करू, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला आहे.