रत्नागिरी ; जिल्हयात 7 ते 11 या वेळेत काही दुकाने उघडी राहतील

0
295
बातम्या शेअर करा

रत्नागिरी–जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी ब्रेक द चेन चा पुढील आदेश काढला असून यापुढे सकाळी 7 ते 11 या वेळात जिल्ह्यातील काही अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी राहतील.

सकाळी सात ते अकरा या वेळेत किराणामाल दुकाने ,भाजीपाला दुकाने ,फळ विक्रेते दूध डेअरी बेकरी मिठाई खाद्य दुकाने, मटन चिकन पोल्ट्री ,मासे आणि अंडी पदार्थ विक्री दुकाने, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने ही सकाळी सात ते सकाळी सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत .

ग्रामीण भागामध्ये पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात सर्व प्रकारची किराणामाल दुकाने भाजीपाला दुकाने फळ विक्रेते दूध डेअरी बेकरी मिठाई खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 या कालावधीसाठी खुली राहतील व याच कालावधीत विक्री करता येईल .इतर कालावधीत सदर दुकाने विक्रीसाठी बंद राहतील .तसेच रेशन धान्य दुकान केरोसीन दुकान सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहील तसेच होम डिलिव्हरी करणारे सकाळी सात ते रात्री आठ या वेळेपर्यंत असून घरपोच सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण rt-pcr,RAt चाचणी करणे बंधनकारक असल्याचे त्याचप्रमाणे प्रमाणपत्र त्यांनी स्वतः जवळ बाळगणे आवश्यक आहे .रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय, आरोग्य सुविधा व मेडिकल दुकाने पूर्ण वेळेत सुरू राहतील.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here